नवी दिल्ली
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. गेल्या महिन्यात देखील अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी यांना वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह विविध तज्ञांकडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. अशी माहिती सध्या समोर आली आहे.