3.8 C
New York

Paris Olympics 2024 : भारताचे आजचे वेळापत्रक पुढील प्रमाणे

Published:

निर्भयसिंह राणे

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) चा 10 वा दिवस पदकाशिवाय भारतासाठी एका निराशाजनक पद्धतीने संपला, परंतु चाहत्यांमध्ये अजूनही अशा जागृत असून आजच्या खेळांकडे त्यांचे लक्ष्य असणार आहे. तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये सुरवर्णपदक जिंकणारा ट्रॅक अँड फिल्ड ऍथलिट नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आज मैदानात उतरणार आहे. याव्यतिरिक्त, भारतीय हॉकी संघ सुद्धा आज उपांत्यफेरीच्या सामन्यासाठी खेळणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीराजच्या कामगिरीत मोठी वाढ झाली आहे. नीरजने 2023 च्या जागतिक ऍथलेटिक्समध्ये 88.17 मीटरचा थ्रोव करून सर्वोत्कृष्ट पारितोषिकही जिंकले. परंतु यंदा नीरजचा पात्रताफेरीत सामना पाकिस्तानच्या अर्शद नदीम सोबत होईल. दरम्यान, पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनीशी भिडणार असून, अंतिम फेरी गाठण्याचं उद्दिष्ट भारताचे असेल. भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या फोगात वटच्या दोन सामन्यांमध्ये शानदार लवचिकता दाखवून विजय मिळवला आहे. मात्र, मेन इन ब्लुला अमित रोहिदास यांच्या अनुपस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

IND vs SL ODI : हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वनिंदू हसारंगा उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे

दिवसाची सुरुवात पुरुषांच्या टेबल टेनिस फेरीने होईल, तर कुस्ती स्पर्धेची सुरुवात सुद्धा लवकरच होईल.

टेबल टेनिस : दुपारी 1:30 pm : हरमीत देसाई, शरथ कमल आणि मानव ठक्कर विरुद्ध चीन पुरुष संघासोबत प्री-क्वार्टर फायनल.

ऍथलेटिक्स : दुपारी 1:50 pm : किशोर जेना पुरुष भालाफेक पात्रता गट अ

कुस्ती : दुपारी 2:30 pm : विनेश फोगाट विरुद्ध युई सुसकी (Japan) महिला फ्री स्टाईल ५०KG १६ फेरी.

ऍथलेटिक्स : दुपारी 2:50 pm : किरण पाहाल महिलांच्या ४०० मीटर रिपाशज
दुपारी 3:20 pm : पुरुष भालाफेक पात्रता गट ब मध्ये नीरज चोप्रा

कुस्ती : दुपारी 4:20 pm : विनेश फोगट महिला फ्रीस्टाईल ५०KG उपांत्यपूर्व फेरीत (पात्रतेवर अवलंबून

रात्री 10:25 pm: विनेश पोघाट महिला फ्रीस्टाइल 50KG उपांत्य फेरीत (पात्रतेवर अवलंबून)

पुरुष हॉकी:

रात्री 10:30: भारत विरुद्ध जर्मनी उपांत्य फेरीत

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img