23.1 C
New York

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या समोर आदिवासी आणि कोळी समाजाच्या बैठकीत गोंधळ

Published:

मुंबई

सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House Meeting Dispute) झालेल्या बैठकीत गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्री (Eknath Shinde) आणि कोळी समाजासोबत (Koli Samaj Meeting) ही बैठक आयोजित करण्यात आली होती. जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी संपूर्ण राज्यातील कोळी समाज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आला होता. यावेळी आयुक्तांनी कोळी समाजाच्या काही लोकांचा बोगस असा उल्लेख केला. यावरुन कोळी समाज आक्रमक झाला आणि त्यांनी घोषणाबाजी केली.

कोळी समाजाच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा गोंधळ झाला आहे. कोळी समाजाच्या नागरिकांना एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अडचणी येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली होती. या बैठकीत कोळी समाजाच्या प्रतिनिधींकडून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीविरोधात आक्षेप नोंदवण्यात आले. तसंच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी वेगवेगळ्या कोळी समाजाच्या संघटनांकडून करण्यात आली. या बैठकीत कोळी समाजाला बोगस बोललं गेल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

आदिवासी कोळी समाज आणि अनूसुचित जमातीच्या समाजाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक दुपारी 3 वाजता सुरू झाली. बैठकीत गोंधळ सुरू झाल्यानंतर स्वत: मंत्री गिरीश महाजन यांना मध्यस्ती करावी लागली. या बैठकीत अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, धर्मराव बाबा आत्राम आणि 10 आमदार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img