8.3 C
New York

Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपापूर्वीच काँग्रेसची रणनीति ठरली ?

Published:

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही रणनीति आखली जात आहे. असे असतानाच आता काँग्रेस राज्यात 120 जागा लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठकआगामी निवडणुकीसंदर्भात रविवारी मुंबईत पार पडल्या. या बैठकीत काँग्रेस पक्षाने विरोधी आघाडी महाविकास आघाडीच्या 7 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीसाठी रणनीती ठरवली. काँग्रेसचे मनोबल लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर उंचावले आहे. काँग्रेस सातत्याने जास्त जागांची मागणी त्यामुळे करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110 ते 120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि इतर बाबींवर 7 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचाही सहभाग असणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे त्यादिवशी मुंबईत येतील, महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यात निवडणुकीबाबत चर्चा होईल. या बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

Congress मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसची बैठक

या भेटीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी मुंबईत मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसची बैठक झाली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला या बैठकीत यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीतील पक्षाची रणनीती आणि मुद्द्यांवर चर्चा झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img