23.1 C
New York

Uddhav Thackeray : नवी मुंबईतील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या संपर्कात

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकी (Assembly Elections) करता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश राज्यात मिळाले आहे. महायुतीला (MahaYuti) आवश्यक असलेले यश मिळालं नसल्याने महायुतीतील नेते सतर्क झाले आहे. महायुतीच्या वतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यात विविध ठिकाणी आढावा घेत आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीतील मिळालेल्या यशामुळे महायुतीतील अनेक मोठे नेते महाविकास आघाडी (Uddhav Thackeray) परतीच्या मार्गावर आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण झाले आहे. अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईतलं एक मोठं राजकीय नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नवी मुंबईतील ताकद आणखी वाढणार आहे तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याचा देखील बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहे. यातील बहुतांश नेते अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील आहेत. तर भाजपच्या काही नाराज नेत्यांनी देखील महाविकास आघाडीची कास धरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील ते मोठं कुटुंब नेमकं कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे 45 हून अधिक खासदार निवडून येतील, असा दावा महायुतीने केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. 48 पैकी केवळ 17 जागांवरच महायुतीचे खासदार निवडून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारत आपले 31 खासदार निवडून आणले. आता लोकसभेत लागलेल्या निकालावरुन विधानसभेतही महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार अशी चर्चा आहे. अशातच भाजप आणि शिंदेंची साथ सोडत अनेक नेते विरोधकांच्या गळाला लागतील, असं बोललं जातंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img