7.6 C
New York

Shravani Somvar : ओतूरला श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी

Published:

रमेश तांबे, ओतूर

भाविकांचे श्रध्दास्थान असलेले ओतूर येथील ग्रामदैवत, श्री कपर्दिकेश्वर पहिला श्रावणी सोमवार (Shravani Somvar) यात्रे निमित्त दि.५ रोजी हजारो भाविकांनी कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलींगावर तयार करण्यात आलेल्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

दरवर्षी श्रावण महिन्यात श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार करण्यात येतात,पिंडींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दरवर्षी ओतूरला येतात. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री कपर्दिकेश्‍वर मंदिरात शिवलिंगावर तांदळाची एक कलात्मक पिंड तयार करण्यात आली होती.पहाटे सहा वाजता अक्षय ढमाले व रामदास श्रीधर येवले यांच्याहस्ते सपत्नीक महाअभिषेक,आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

यावेळी श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, नितीन तांबे,अमोल डुंबरे,सागर दाते,महेंद्र पानसरे,जितेंद्र डुंबरे,सचिन तांबे आदी ग्रामस्थ व भाविक उपस्थीत होते. नवोदित गणेश मंडळ वरील आळी यांच्या वतीने लाडू व केळी वाटप करण्यात आले. तसेच रामदास ढमाले,अनिल सुदाम ढमाले व ढमाले मळा मित्रपरिवार यांच्यातर्फे खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच पांडुरंग ताजणे यांच्यातर्फे केळी वाटप करण्यात आले.

 पहिला श्रावणी सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ वाजता शालेय दिंडी महोत्सव व दुपारी १२ ते ६ वाजता वारकरी भजन महोत्सवाचे श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली असून भाविकांनी बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा लाभ घेतला.ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img