19.7 C
New York

Sheikh Hasina : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, हसीना भारतात दाखल

Published:

नवी दिल्ली

बांगलादेशमध्ये (Bangladesh) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina

) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार (Bangladesh Clashes) सुरू आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देत बांगलादेश सोडला असून त्या भारतामध्ये दाखल झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

गेल्या महिन्यात, बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांची पोलीस आणि सरकार समर्थक निदर्शकांशी हिंसक झटापट सुरू आहे. या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कोटा कमी करण्याचा निर्णय घेतल्यावर गोष्टी व्यवस्थित होताना दिसत होत्या, मात्र रविवारी लाखो लोक शेख हसीनाच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले. सध्याच्या घडीला बांगलादेशची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img