3.5 C
New York

Raj Thackeray : विधानसभेसाठी राज ठाकरेंकडून उमेदवार जाहीर

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदावादी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत.

Raj Thackeray मनसेच्या प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलंय?


मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा – नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मा.राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.

  1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर
  2. पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे

अन् आता भेदभाव केल्याचा घणाघात, राज ठाकरेंची मोदींवर जोरदार टीका

Raj Thackeray शिवडी विधानसभा (Shivadi Vidhan Sabha Election 2024)


शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडे यांचा पराभव करुन, दुसऱ्यांदा विधानसभेवर ठाकरेंचा झेंडा फडकवला होता.

Raj Thackeray शिवडी मतदारसंघातूनच बाळा नांदगावकर चार वेळा आमदार


शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1995-2004) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img