21 C
New York

Parambir Singh : देशमुखांच्या आरोपांवर परमबीरसिंह यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Published:

मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांच्या डील झाली होती असे म्हटले होते. आता यावर परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर दिले आहे. परमबीरसिंह म्हणाले की, अनिल देशमुख यांना मानसिक उपचाराची गरज आहे.

परमबीरसिंह म्हणाले की, माजी पोलीस महासंचालक परमबीरसिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता, अनिल देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळत, देशमुख यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे. त्यामुळे, राज्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावरुन राजकीय वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

परमबीरसिंह म्हणाले की, तसेच, याप्रकरणी माझी प्रथम एटीएस चौकशी झाली, मग एनआयएने केली, मी चौकशीला सामोरा गेलो, पण तपासात काहीच आलं नाही. माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत, पुरावे असतील तर ते आणून द्यावेत. अन्यथा, मी बाकीचे कांड बाहेर काढेन. तसेच, आता जे समोर आलंय ते 10 टक्के आहे. बाकी पोलीस अधिकारी ज्यांना अनिल देशमुख यांनी सतावलं त्यांनी समोर येण्याची हिंमत केली नाही. सलील देशमुख, अनिल देशमुख, संजय पांडे आणि माझी एकाच दिवशी नार्को टेस्ट करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. आपण नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारतो आणि एकाच दिवशी आमची सर्वांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही परमबीर सिंह यांनी केली.

परमबीरसिंह म्हणाले की, देशमुखांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. मी जर गुप्तपणे देवेंद्र फडणवीस यांना भेटत असेल, त्यांच्यासोबत डील करत असेल तर तुम्ही तेव्हा सरकारमध्ये होतात, मग तुमच्याकडे काही पुरावे असतील ते समोर आणावे, असे आव्हानही परमबीर सिंह यांनी म्हटले. या आरोपांवपर मी आता वकिलांचा सल्ला घेऊन, कायदेशीर कारवाई करणार आहे. पण, मला अशा प्रकारच्या तू तू मै मै मध्ये अजिबात रस नाही, असेही परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच, अनिल देशमुख अशा प्रकारचं राजकारण का करत आहेत, ते कशामुळे असे आरोप करत आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का, याची उत्तरे मानस विकार तज्ज्ञच देतील, असेही सिंह यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img