4.1 C
New York

Raj Thackeray : …आरक्षणाची गरजच नाही; असं का म्हणाले राज ठाकरे?

Published:

मनसे प्रमुख राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणावर भाष्य केलं. महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. (Reservation) मला असं वाटतं की यामध्ये जात कुठे येते? महाराष्ट्रातील आपल्या मुला-मुलींना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. (Raj Thackeray ) महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण बघतो मग हा जातीचा विषय आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

खासगी संस्थांमध्ये आरक्षण आहे का? नेमकं किती मुलांना आरक्षण मिळणार आहे. हे आपण तपासणार आहोत का? माथी भडकवायची. हे सर्व जे राजकारण सुरू आहे ते कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मतांसाठी राजकारण सुरू आहे. मुलामुलींच्या विचार करत नाही. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे असा घणाघातही राज ठाकरे यांनी विरोधकांवर केला.

विधानसभेसाठी राज ठाकरेंकडून उमेदवार जाहीर

बाहेरच्या राज्यातील मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकवतात. आपल्या राज्यातील शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतात. सर्व गोष्टी पैशावर येतात. मूळ विषय बाजुला राहतो आणि आपण भरकटतो. हे भरकटणं नाही तर विष कालवणं आहे. लहान मुलं जातीवर बोलतात. महाराष्ट्रात असं कधीच नव्हतं. ज्या राज्याने देशाला दिशा दिली ते जातीपातीत खीतपत पडलंय.

सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टींमुळे डोकं फिरलं आहे. महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे. २००९ ची भाषणं काढून पाहा. कोणी मला साथ दिली नाही. राजीव गांधींनंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं आहे. मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही असं राज ठाकरे म्हणालेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img