23.1 C
New York

Maratha Reservation : हॉटेलमध्ये राडा, मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं… काय घडलं?

Published:

धाराशीव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसल्याची घटना धाराशीवमध्ये घडली आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी आणि मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आदोलकांनी केली होती. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांनी (Maratha Protest) आक्रमक पावित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला होता.

महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यानंतर राज ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं. राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले. पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिय्या मांडला आहे. मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाताना दिसत आहे. ते राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाम आहेत.

मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी दोन आंदोलकांना भेटण्यासाठी परवानगी दिली. पण कार्यकर्त्यांना ते मान्य नाही. राज ठाकरे यांनी सर्वांना एकत्र भेटावं, असं आंदोलक म्हणाले. यावेळी राज ठाकरे सर्व कार्यकर्त्यांसमोर आले. त्यांनी भेटीसाठी परवानगी दिली. पण यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. माझ्याशी बोलायचं आहे ना? मग वरती या. या घोषणा आधी बंद करा असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर राज ठाकरे यांनी आपल्यासोबत अरेरावीची भाषा केली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img