23.1 C
New York

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

Published:

मुंबई

राज्यातील विविध प्रकल्पासंदर्भात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दिल्ली दौरा आयोजित करण्यात आला होता. पण राज्यातील पाऊस आणि काही भागातील पूर परिस्थितीचा (Pune Visit flood) आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर पडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात राज्यातील वेगवेगळ्या प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा होणार होती. तसंच विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात होता. मात्र राज्यातील आपत्कालीन व्यवस्था आणि मदतकार्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व प्रशासकीय संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. आज पूर परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती होती. मात्र दिल्ली दौरा रद्द करीत ते पुण्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. एकतानगर आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी शिंदे भेट देणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी निवडणूक आयोग आचारसंहिता लावेल. तसंच सुप्रीम कोर्टामध्येही येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना नेमकी कुणाची? याबाबतच्या सुनावणीलाही सुरूवात होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img