22.5 C
New York

Share Market : शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले!

Published:

भारतीय शेअर बाजार आज सोमवार (5 ऑगस्ट)रोजी घसरणीसह उघडला. जागतिक बाजारात जोरदार विक्री दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटसह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी 350 हून अधिक अंकांची मोठी घसरण झाली आहे. (Share Market) अमेरिकन फ्युचर्स मार्केट देखील लाल रंगात होते. Dow 230 399 अंकांनी तर Nasdaq फ्युचर्स 399 अंकांनी खाली आला. शुक्रवारी देशांतर्गत बाजारात FII द्वारे 13,000 कोटी रुपयांची विक्री झाली.

Share Market बाजार खुला होताच मोठी पडझड!

आज भांडवली बाजाराच्या नव्या आठवड्याचा पहिलाच दिवस होता. मात्र या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 हा बाजार खुला होताच 393 अंकांनी घसरला. तर दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 1298 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. म्हणजेच बीएसई आणि एनएसईत बाजार चालू होताच मोठी घसरण झाली.

Share Market शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय आहे?

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 80,981.95 अंकांवर बंद झाला होता. पण आता चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एनएसईत मोठी पडझड झाली. बीएसई निर्देशांक 1298 अंकांच्या घसरणीसह चालू झाला. ही घसरण आणखी वाढली असून सध्या ही पडझड 1,510.22 अंकांपर्यंत वाढली आहे. मुंबई शेअर बाजारातील ही घसरण साधरण 1.9 टक्के आहे.

Share Marketv राष्ट्रीय शेअर बाजाराच्याही गटांगळ्या

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या निर्देशांकाचीही असीच स्थिती आहे. निफ्टी निर्देशांक 393 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24,717.70 अंकांवर बंद झाला होता. तर आज (5 ऑगस्ट) निफ्टी निर्देशांक 24,302.85 अंकांनी खुला झाला. सध्या ही पडझड 436.50 अंकांपर्यंत वाढली असून पडझडीचे हे प्रमाण 1.77 टक्के आहे.

Share Market शेअर बाजारातील पडझडीचे नेमके कारण काय?

भारतीय शेअर बाजाराच्या पडझडीला अनेक घटना कारणीभूत ठरल्या आहेत. यात सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाची स्थिती ही आहे. या दोन्ही देशांतील तणाव सध्या वाढला आहे. याच कारणामुळे अमेरिका आणि इंग्लंडने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याची सूचना दिली आहे. दुसरीकडे अमेरिकेतील बेरोजगारीने डोकं वार काढलंय. अमेरिकेतील महागाईदेखील वाढल्याचं चित्र दिसतंय. शुक्रवार मोठी पडझड अमेरिकन शेअर बाजारात झाली होती. त्यामुळे त्याचाच परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img