4 C
New York

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी एकाच वाक्यात ‘तो’ विषय संपवला

Published:

‘झूठ बोले कव्वा काटे काले कव्वे से डरियो’, या एका वाक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर विषय संपवलायं. दरम्यान, तत्कालीन महाविकास सरकारला पाडण्यासाठी परमवीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाली असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी केलायं. या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी गाण्याचे बोल म्हणत प्रत्युत्तर दिलंय.

अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरण सध्या राज्यात चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणी अनिल देशमुखांवर सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत तर दुसरीकडे अनिल देशमुखांकडूनही फडणवीस आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर आरोप केले जात आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना चांदीवाल आयोगाचा अहवाल आला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी काल स्पष्ट केलं आहे. या अहवालामध्ये नेमकं काय आहे, हा अहवाल जनतेसमोर आणण्यात यावा, अशी विनंतीच अनिल देशमुख यांनी फडणवीसांना केलीयं.

विधानसभा निवडणुकीआधी भाजपचं टेन्शन वाढणार…

तसेच देवेंद्र फडणवीस हे आत्ता खोटं बोलत आहेत,अंबीनींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाची हत्या झाली होती. या प्रकरणाचा मास्टरमाईंड परमवीर सिंह असून त्याला एएनआयकडून अटक करण्यात येणार होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि परमवीर सिंह यांच्यात डील झाल्यानंतर त्यांना अटक झाली नाही. तुम्ही अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंह यांना सांगितलं होतं, त्यामुळे माझ्यावर सिंह यांनी आरोप केले असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलायं.

सध्या बड्या शहरांमध्ये झोपडपट्टीधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला जमीन देण्याची आमची मानसिकता असून गरीबाला जमीनीचा अधिकारा देण्यासाठी आमचा प्रयत्न असणआर आहे. हजारे पट्टे सध्या प्रक्रियेत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

यासोबतच सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय नेत्यांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलायं तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरुनही घमासान सुरु आहे. तर आता एससीएसटी आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर लागू करण्याचा अधिकारा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. यावर बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच काय? असं विधान केलं आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाबाबत जे भाष्य केलंयं त्याबाबत मला माहिती नाही, मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलंय, ते टिकलं पाहिजे शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिज, यासाठी आमचं सरकार कटीबद्ध असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img