21 C
New York

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, ठाकुर्ली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

Published:

कल्याण

कल्याण-कसारादरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुपारी तीनच्या सुमारास ठाकरे स्थानकात दरम्यान ओव्हर हेड वायर (Over Head Wire) तुटल्याने कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सर्व लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या आहे.

लोकल धावत असताना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटली. स्फोटासारखा आवाज झाल्याने प्रवाशांची प्रचंड धावपळ झाली. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विशेष म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या आहेत. तर ओव्हरहेडचा स्फोट ऐकून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर जाणाऱ्या लोकल ट्रेन मधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांना मदत करत थांबलेल्या लोकल ट्रेन मधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक प्रवासी खाली उतरून रेल्वे रुळावरुन चालत पुढे जात आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img