मुंबई
- मुंबईतील दहिसर (Dahisar) पश्चिम म्हात्रे वाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटीची बैठक (Society Meeting) सुरू असताना सोसायटीचे सदस्य आदित्य देसाई (Aditya Desai) यांचा सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार (Nithyananda Parihar) यांच्याशी वाद सुरू झाला. पीडित आदित्य देसाईने सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यावर आरोप केला की, भांडणाच्या वेळी त्यांनी अंगठा चावून त्याचे दोन तुकडे केले.
मुंबईच्या दहिसर येथील पश्चिम म्हात्रेवाडी येथील अमरनाथ अपार्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटी अध्यक्षांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. या बैठकीला अध्यक्षांसह सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी, सोयायटी सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटी अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यासोबत वाद झाला. या झटापटीत अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी चक्क दाताने सदस्य असलेल्या आदित्य यांचा अंगठाच तोडल्याचा आरोप आदित्या यांनी केला आहे. या घटनेनं सोसायटीत चांगलीच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्या हाताला ड्रेसिंग केली आहे. याप्रकरण एमएचबी पोलिसांकडून याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.