यवतमाळ
कुणबी मराठा (Kunbi Maratha) हे खरे ओबीसी नाहीत. त्यांच्यापासून सावध रहा. विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) निकाल लागल्यानंतर ओबीसी आरक्षण (OBC Reservation) स्थगित केले जाईल असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. ओबीसी आरक्षण बचाओ यात्रा यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचे विधान केले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या मागणीला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. पुसद येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचे विधान केले.
कुणबी मराठ्यापासून सावध रहा, याचं कारण आताचं जे सभागृह आहे; यामध्ये १९० कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 ओबीसींचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला, तरी सभागृहात तो म्हणतो की मी मराठ्यांबरोबर आहे असे प्रकाश आंबेडकर सभेला संबोधित करताना म्हणाले.
तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही. तो वंजाऱ्यांबरोबर नाही. तो लिंगायतांबरोबर नाही. तो बंजाऱ्यांबरोबर नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार, धनगर यांच्याबरोबर तर अजिबातच नाही. सावध रहा. यांच्यापासून सावध रहा”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातील समाजघटकांना दिला.
ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे का, तर शंभर टक्के धोका आहे. निवडणुकीच्या आधी नाही, पण निवडणुकीच्या नंतर आहे. माझ्या आधीच्या एका वक्त्याने ओबीसींची जातगणना झाली पाहिजे याबद्दल भाष्य केलं. ती झाली पाहिजे अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
नवीन विधानसभा जेव्हा अस्तित्वात येईल. दोन तीन महिन्यात निवडणूका होतील. त्या नवीन विधानसभेत ओबीसींची ही जी मागणी आहे की, जात जनगणना केली पाहिजे, ती ताबडतोब मान्य होईल. सर्व ओबीसींना वाटेल आपली मागणी मान्य केली. पण, त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल, तो म्हणजे जोपर्यंत ओबीसी प्रत्यक्षात किती टक्के आहे ही आकडेवारी येत नाही, तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असे विधान आंबेडकर यांनी केले आहे.