21.5 C
New York

BSNL : भारतात BSNL 5G नेटवर्कची चाचणी झाली यशस्वी

Published:

खाजगी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्याने ग्राहक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यानी आपल्या रिचार्जच्या किंमत वाढवल्याने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.महिन्याच्या सुरुवातीस रिचार्ज दरांमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली. (Network) याचा थेट परिणाम मोबाईल वापरकर्त्यांवर झाला आहे. यासाठी पर्याय म्हणून मोबाईल वापरकर्त्यांनी आपले मोबाईल नेटवर्क अन्य स्वस्त नेटवर्कमध्ये स्विच करण्याचं प्रमाण वाढवलं आहे.या सर्व बाबी लक्षात घेता बीएसएनएलने 5G नेटवर्कच्या स्पर्धेमध्ये आता प्रवेश केला आहे. बीएसएनएल 4G नेटवर्क देत आहे. काही ग्राहकांनी मोबाईल रिचार्जमध्ये झालेल्या दरवाढीनंतर बीएसएनएल मध्ये कार्ड पोर्ट करून घेतलं. पण ज्या ग्राहकांना 5G नेटवर्क पाहिजे असल्याने काही ग्राहकांनी आहे त्या खाजगी नेटवर्कमध्येच समाधान मानलं आहे किंवा मानाव लागत आहे.

भारतातील दूरसंचार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL लवकरच भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. BSNL देशभरातील विविध शहरांमध्ये 5G सेवा परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या 5g नेटवर्कची यशस्वी चाचणी केली. त्यांनी बीएसएनएल 5g नेटवर्क वापरून व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. सिंधिया यांनी x वर व्हिडिओ शेअर केला आहे. BSNL 5G च्या टेस्टिंग साठी सिंधिया स्वत: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) येथे पोहोचले. त्यांनी स्वतः बीएसएनएलच्या 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉल केला आणि 5G नेटवर्कच्या क्षमतेची चाचणी केली.

BSNL 5G बद्दल टेक एक्सपर्ट्स आणि टेक्नॉलॉजीवरज्योतिरादित्य सिंधिया यांनी चर्चा केली. जागतिक तंत्रज्ञान उद्योगातील भारताच्या धोरणाबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. भारतात नवीन तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याचे सिंधिया यांनी सांगितलं. नवीन तंत्रज्ञान आल्यावर लवकरच संपूर्ण जग भारताकडे बघेल असा विश्वास ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केला. तसेच 6G तंत्रज्ञानावरही BSNL लवकरच काम सुरु करेल असं सिंधिया यांनी म्हंटल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img