22.1 C
New York

Kedarnath Rescue : मोठी बातमी! केदारनाथमध्ये एक हजार लोक अडकले

Published:

उत्तराखंड राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार (Kedarnath Rescue) पाऊस झाला. या पावसामुळे टिहरी जिल्ह्यातील घनसाली आणि केदारनाथ धाम येथील पायवाटांचे मोठे नुकसान (Uttarakhand Rain) झाले आहे. येथे गेलेले पर्यटक आणि भाविक अडकून पडले आहेत. या भागात अजूनही एक हजार लोक अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 120 जणांचा समावेश आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र वातावरण आणखी खराब झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन थंडावले आहे. मागील चार दिवसांपासून एकाही व्यक्तीला बाहेर काढता आलेले नाही. आतापर्यंत 9099 लोकांना येथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात आला. तसेच 400 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. आता या भागात अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता या मोहिमेत आणखी गती आणण्यासाठी भारतीय सैन्याची (Indian Army) मदत घेतली जात आहे.

येथे तैनात असलेल्या 6 ग्रेनेडियर युनिट कर्नल हितेश वशिष्ठ यांच्या नेतृत्वात सैन्य दलाच्या तुकड्या रस्त्यांचे बांधकाम, पूल उभारणी यांसह शोध मोहिम राबवत आहे. सर्वात आधी सोनप्रयाग ते गौरीकुंड दरम्यानच्या मार्गावर एक पूल तयार केला जात आहे. जिल्हाधिकारी सौरभ गहरवार, पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांच्याकडून या कामांचं नियोजन केले जात आहे. सध्या येथील हवामान खराब आहे. त्यामुळे शनिवारी चिनूक आणि एमआय 17 हेलिकॉप्टरचा वापर करता आला नाही. लहान हेलिकॉप्टरच्या मदतीने भीमबली, चीरवासा आणि लिनचोसली भागात अडकलेल्या जवळपास एक हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि मंदिर समितीच्या पथकांनी 600 लोकांना केदारनाथ धाम परिसरातील अन्य पर्यायी मार्गांनी सुरक्षित बाहेर काढले. या मोहिमेत आतापर्यंत 9 हजार 99 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर एक हजार लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

31 जुलै रोजी केदार घाटी परिसरात ढगफुटी होऊन अतिमुसळधार पाऊस झाला होता. येथे भुस्खलनही झाले होते. या घटनांमुळे पायवाटा उद्धवस्त झाल्या. पायवाटाच नसल्याने भाविक ठिकठिकाणी अडकून पडले. भाविकांचा आकडा दहा हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जात होते. भीमबल, लिनचोल आणि गौरीकुंड भागातील लोकांनी मंदाकिनी नदीला आलेला पूर पाहून जवळच्या जंगलात धाव घेतली. एक रात्र या ठिकाणीच मुक्काम केला. त्यानंतर सकाळी पुन्हा सुरक्षित ठिकाणी आले. राज्य सरकार मागील चार दिवसांपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि आपत्त व्यवस्थापन विभागाच्या 882 सदस्यांच्या पथकाच्या मदतीने लोकांना बाहेर काढत आहे. येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारनेही हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी जवळपास एक हजार लोक अडकल्याचे सांगितले जात आहे. खरेच किती जण अडकलेत याचा निश्चित आकडा सांगणे कठीण आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img