नाशिक
रक्ताचा थेंब शेवट पर्यतअसे पर्यत महायुती (MahaYuti) सरकार लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरुच ठेवणार असल्याचा दावा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. लाडकी बहीण योजना महाविकास आघाड़ी (Mahavikas Aghadi) सरकार आले तर बंद होईल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा नियोजन समितीच्या ३०५४-२१०५ योजनेतून येवला मतदारसंघातील १६ रस्ते पुलांसाठी ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होऊन मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील डोंगरगाव ते आडसुरेगाव वस्ती रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कुसमाडी हडपसावरगाव लहीत ग्रामीण मार्ग रस्त्यावर लहान मोरीचे बांधकाम करण्यासाठी २६ लाख, भाटगाव ते कोल्हे वस्ती रस्ता सुधारणा करण्यासाठी व छोटा पूल बांधण्यासाठी ६० लाख, नेऊरगाव ते चिचोंडी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३० लाख, डोंगरगाव ते आडसुरेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग नगरसुल ते रावतेवस्ती रस्त्याची सुधारणा, प्रमुख जिल्हा मार्ग ३९ ते कटके वस्ती नगरसुल रस्ता सुधारणा, पिंपळगाव लेप ते शेवगे रस्ता सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख, ममदापूर पन्हाळसाठे ग्रामीण मार्ग ११ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २० लाख, कोळम खु. ते कोळम बु. रस्त्याची सुधारणा, राजापूर पन्हाळसाठे बोडके वस्ती या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगाव ते शास्त्रीनगर रस्त्याची सुधारणा, राज्यमार्ग ७ ते लासलगाव गावांतर्गत ग्रामीण मार्ग १११ या रस्त्याची सुधारणा, विंचूर ते विठ्ठलवाडी ग्रामीण मार्ग २२८ या रस्त्याची सुधारणा, मानोरी फाटा ते मानोरी खुर्द ग्रामीण मार्ग ५७ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख, बोकडदरे ते धारणगाव खडक चारी नं. १८ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.