23.1 C
New York

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचं फडणवीसांना नवं चॅलेंज!

Published:

अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वाद राज्यभरात चर्चेत आहेत. तुरुंगात असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी काल अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्यानंतर या वादाला आणखीच फोडणी मिळाली. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी तत्काळ प्रसारमाध्यमांसमोर येत सचिन वाझेंचे आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीसांची नवी चाल आहे. वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा, असे आव्हान दिले. देशमुख पुढे म्हणाले, परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी तीन वर्षांपूर्वी माझ्यावर जे आरोप केले होते त्या आरोपांची न्या. चांदीवाल यांनी अकरा महिने चौकशी केली

सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले. यामध्ये आणखी कुणा नेत्याचं नाव आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारलं असता सचिन वाझेंनी जयंत पाटील यांचं नाव घेतलं. आता जयंत पाटील यांचं नाव वाझेंनी घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीत सचिन वाझेने स्पष्ट सांगितले होते की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने मला पैसे मागितले नाहीत आणि मीही त्यांना कधीच पैसे दिले नाहीत. दहशतवाद आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या कुबड्या घेऊन माझ्यावर आरोप करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे, असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी हा 1400 पानांचा अहवाल राज्य सरकारला दोन वर्षांपूर्वीच सादर केला आहे. परंतु, सरकार हा अहवाल सार्वजनिक करत नाही. याआधी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं तरी देखील अहवाल लोकांसमोर आला नाही. या अहवाल मला क्लिनचीट देण्यात आली होती. तशा बातम्याही आल्या होत्या. या अहवालात मला क्लिनचीट मिळाल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल दडवून ठेवला असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

दरम्यान, मी चार पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. जी काही वस्तुस्थिती होती मी ती सर्वांसमोर आणली होती. ज्यावेळी ही गोष्ट मी महाराष्ट्रासमोर आणली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल आहे. सचिन वाझे यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझे यांच्याबाबतीत अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की सचिन वाझे एक अपराधी पार्श्वभुमी असलेला व्यक्ती आहे असे अनिल देशमुख काल म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img