21 C
New York

Anil Deshmukh : “…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ‘तो’ रिपोर्ट दडवून ठेवलाय”- अनिल देशमुख

Published:

मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक आवाहन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमूर्ती चांदीवाल (Justice Chandiwal Commission) यांच्या कोर्टाने शासनाकडे सादर केलेला चौकशी अहवाल (Report) लोकांसमोर आणाव अशी मागणी देखील देशमुखांनी यावेळी केली आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) याने काल जे माझ्यावर आरोप केले होते, तेच आरोप 3 वर्षापुर्वी केले होते. फडणवीसांनी वाझेचा आधार घेऊन माझ्यावर असे आरोप केले होते.

अनिल देशमुख नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, माझ्यावर 3 वर्षापूर्वी परमबीर सिंग व सचिन वाझे याने माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी ११ महिने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी व दोन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझेने उलट चौकशीत स्पष्टपणे सांगितले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने मला पैसे मागितले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. दोन खुनाच्या गुन्ह्यातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुद्धीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुद्धा आयोगासमोर बोलवले होते. परंतु सहा वेळा समन्स पाठवून सुद्धा ते आले नाहीत. शेवटी अटक वॉरंट काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी वकिलाच्या मार्फत शपथपत्र लिहून दिले की, मी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते ऐकीव माहितीवर केले आणि त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img