19.7 C
New York

Accident : अहमदनगर- कल्याण महामार्गावरील ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात चार महिला ठार

Published:

रमेश तांबे, ओतूर

पिंपळगाव जोगा ( ता.जुन्नर ) जि.पुणे गावचे हद्दीत रविवारी सकाळी ट्रॅव्हल्स आणि ब्रिझा कारची समोरासमोर धडक होऊन या अपघातात (Accident) चार महिला ठार झाल्या, तर आठ जण  जखमी झाल्याची घटना अहमदनगर- कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) रविवारी दि.४ रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चौघींचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात भाग्यश्री साहेबराव गायकर वय १८ वर्षे, सविता साहेबराव गायकर वय ३८ वर्षे दोघी रा.कळंब, ता.अकोले, जि. अहमदनगर, कुसुम मारूती शिंगोटे वय ५५ वर्षे रा.बदगी बेलापुर, ता. अकोले, जि. अहमदनगर, सुनिता कारभारी हाडवळे वय ५७ वर्षे,रा.लिंगदेव, ता.अकोले, जि.अहमदनगर, या चौघींचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहे.

अपघाताची खबर ट्रॅव्हल्स चालक धनंजय स्वपन दास रा. प्रेमनगर, बंगुर नगर, गोरेगाव ईस्ट मुंबई पो मोतीलाल नगर, मुंबई यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की, रविवार दि.४ रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपळगावजोगा गावचे हद्दीत नगर- कल्याण महामार्गावरील पिंपळगावजोगा फाट्याजवळ नगर बाजुकडुन कल्याण बाजुकडे जाणारी ब्रिझा कार एम एच ४३ सीजी २९१३ व कल्याण बाजुकडून अहमदनगर बाजुकडे जानारी टेंम्पो ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच ४७ बीएल ४२५१ ची धडक होऊन या अपघातात भाग्यश्री गायकर वय १८, कुसुम शिंगोटे वय ५५ यांचा जागीच मृत्यू झाला तर सविता गायकर वय ३८ यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सुनीता हाडवळे वय ५७ यांचा आळेफाटा येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच या अपघातात साहिल साहेबराव गायकर वय २२ वर्षे,साहेबराव रामदास गायकर वय ४२ वर्षे दोघेही रा.कळंब,ता.अकोले,जि. अहमदनगर, ससोदर सुमीदर दास वय ४० वर्षे रा.प्रेमनगर, बंगुर नगर,गोरेगाव ईस्ट मुंबई पो मोतीलाल नगर, मुंबई ट्रॅव्हल्सचा ( क्लिनर ) हे जखमी झाले असून,त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तसेच टेंम्पो ट्रॅव्हल्स मधील इतर ४ ते ५ प्रवासी करकोळ जखमी झाले असून त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही.

अपघात घडल्यानंतर ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी थाटे, पोलीस कर्मचारी शामसुंदर जायभाये, सुरेश गेणजे आदी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजुला काढून, या ठिकाणची वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img