18.8 C
New York

Sachin Vaze : सचिन वाझेच्या ‘त्या’ लेटर बॉम्बने खळबळ

Published:

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शंभर कोटींच्या वसुलीचं प्रकरण पुन्हा ताजं झालं आहे. अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी (Sachin Vaze) केली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. इतकेच नाही तर यात जयंत पाटील यांचंही नाव आहे असा मोठा खुलासा सचिन वाझेंनी माध्यमांशी बोलताना केला. सचिन वाझेंच्या या आरोपांनी राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

Sachin Vaze सचिन वाझेंचे आरोप काय ?

सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले. यामध्ये आणखी कुणा नेत्याचं नाव आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारलं असता सचिन वाझेंनी जयंत पाटील यांचं नाव घेतलं. आता जयंत पाटील यांचं नाव वाझेंनी घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

‘देशमुख पैसे घ्यायचे’सचिन वाझेंचा आरोप,फडणवीसांना पत्र

Sachin Vaze अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

मी चार पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. जी काही वस्तुस्थिती होती मी ती सर्वांसमोर आणली होती. ज्यावेळी ही गोष्ट मी महाराष्ट्रासमोर आणली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल आहे. सचिन वाझे यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझे यांच्याबाबतीत अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की सचिन वाझे एक अपराधी पार्श्वभुमी असलेला व्यक्ती आहे.

दोन खून प्रकरणात वाझेंना अटक करण्यात आली आहे. एका खून प्रकरणात ते अजूनही तुरुंगात आहेत. सचिन वाझे विश्वासार्ह व्यक्ती नाही असे हायकोर्टानेच सांगितलं आहे. असे असताना आता माझ्यावर आरोप लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस सचिन वाझेला फसवत आहेत. मी सांगू इच्छितो की माझ्यावर आरोप करण्यासाठी त्यांनी सचिन वाझेला सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे मी आधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img