राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत अशातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महत्त्वाची बैठक होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले. या महत्त्वाच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
फडणवीसांची राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीची राजकीय खलबतं?
Raj Thackrey यशश्री शिंदे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवा
उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या झाली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. नवी मुंबई येथे अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरण देखील फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यात महिलांसंदर्भात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महायुतीत मनसेची भूमिका काय असणार? या विषयावर देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.