26.6 C
New York

Rahul Gandhi : वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा

Published:

केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन होऊन तब्बल ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक घरं, जीव ढिगार्‍याखाली गाडले गेले. (Landslide) या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडला भेट देत भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस १०० पेक्षा जास्त घरं बांधून देणार आहे.

मी वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा केला. ही एक भयंकर दुर्घटना आहे. आम्ही काल घटनास्थळी जाऊन भूस्खलन घडलेल्या भागाची पाहणी केली. तेथील परिस्थितीचं आकलन केलं. त्यानंतर प्रशासनाबरोबर बैठकही घेतली आहे.या दुर्घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी वायनाडला भेट दिली असून भूस्खलनग्रस्तांशी संवाद साधला.

बापरे! एका वर्षात 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं

यादरम्यान राहुल गांधी यांनी भूस्खलनग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. तसंच १०० पेक्षा जास्त घरं बांधण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.. या दुर्घटनेसंदर्भात मी केरळच्या मुख्यमंर्त्यांबरोबर चर्चा करणार आहे. दरम्यान, केरळच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रभारी एडीजीपी एम.आर. शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी माहिती देताना अजित कुमार यांनी सांगितले की, अद्याप ३०० लोक वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता आहेत. तसंच, जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वायनाडमधील ९१ मदत शिबिरांमध्ये ९,३२८ लोक राहत आहेत. दरम्याान, माहिती गोळा करण्यात महसूल विभाग व्यस्त आहे. अशा स्थितीत येत्या एक-दोन दिवसांत चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img