21 C
New York

IND vs SL ODI :भारत-श्रीलंका एकदिवसीय सामना टाय, अंतिम षटकात नाट्यमय संघर्ष

Published:

निर्भयसिंह राणे

भारत आणि श्रीलंका (IND vs SL ODI) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना काल आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळाला गेला आणि दोन्ही टीमच्या बरोबरीच्या स्कोअरने हा सामना टाय झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी 230-8 धावा केल्या आणि त्यानंतर मेन इन ब्लु 47 षटकांत 230 धावांत आटोपला. रोमहर्षक सामन्यात भारताला शेवटच्या तीन षटकांत दोन विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी पाच धाव हव्या होत्या. शिवम दुबेने (25) चारीथ असालंकाला चाकवत चौकार काढला आणि स्कोर बरोबरीत आणला. श्रीलंकेने DRS घेतल्याने शिवम दुबे LBW पायचीत झाला. अर्शदीप सिंग नंतर एक स्लोग स्वीप खेळाला आणि तो सुद्धा LBW पायचीत होऊन मॅच टाय झाली.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मा (58) याच्या सौजन्याने पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. विराट कोहली (24) आणि श्रेयस अय्यर (23) यांनी सुरुवातीपासूनच खेळात मागे असून लवकर बाद होऊन पॅव्हिलियनकडे रावना झाले. केएल राहुल (31) आणि अक्षर पटेल (33) यांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करून भारताचे मॅचमध्ये पुनरागमन केले. टॉस-अप चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्नात राहुलला मात्र यश मिळाले नाही आणि वनिंदूं हंसरंगाच्या बॉलवर बाद झाला.

Team India: T20 मध्ये अव्वल टीम इंडिया! वर्षभरात फक्त एक पराभव

तत्पूर्वी, श्रीलंकेने 101-5 वरून 230-8 अशी मजल मारली. पथुम निसांकाने 75 चेंडूत 56 धावा केल्या असल्या तरी यजमानांनी ठराविक अंतराने विकेट गमावल्या. ड्युनिथ वेललागे (65 चेंडूत 67*) याने अर्धशतक झळकावून श्रीलंकेला सावरले. सात चौकार आणि दोन षटकारांसह वेललागेला जेनिथ लियानागे (20), हसरंगा (24) आणि अकिला धनंजया (17) यांची चांगली साथ लाभली. अखेरीस बरोबरी करण्याआधी खालच्या फळीने श्रीलंकेला साथ दिली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img