21 C
New York

Sachin Vaze : ‘देशमुख पैसे घ्यायचे’सचिन वाझेंचा आरोप,फडणवीसांना पत्र

Published:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईचे निलंबीत पोलीस अधिकारी आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. वसुली प्रकरणात सचिन वाझेंने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव घेतले आहे.

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे वसुली कांड गाजले होते त्याच बाबतीत तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने (Sachin Waze) मोठा खुलासा केला आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले.

मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर

मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख पत्रकार परिषदा घेऊन देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर देण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला होता. यासाठी फडणवीसांनी त्यांचा एक खास माणूस माझ्याकडे पाठवला होता असेही देशमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात सचिन वाझेने देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात अन्य काही नेत्यांची नावं आहेत. अद्याप हे पत्र समोर आलेलं नाही. सचिन वाझेंच्या या आरोपांनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सर्व प्रकरणं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच येऊन कशी थांबतात? सर्व प्रकरणांचे केंद्रबिंदू तेच कसे असतात? असे सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img