9.5 C
New York

Weather Update : रेड अलर्ट! काळजी घ्या, आज दिवसभरात मुसळधार बरसणार

Published:

मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ (Weather Update) घातल्यानंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसांपासून (Rain Alert) विश्रांती घेतलेल्या पावसाने 1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

आता 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अद्याप समाधानकारक पाऊस (Heavy Rain) झालेला नाही. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना मात्र पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टीही झाली आहे. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज तर मुंबईला यलो (Mumbai Rains) अलर्ट दिला आहे.

विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करा; ‘या’ संघटनेचे मागणी

दरम्यान, मागील आठवड्यात पुण्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरुच आहे. काल या जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज (Satara Rains) अलर्ट देण्यात आला आहे. परंतु आज मात्र यातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरात या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात अतिमुसळधार पाऊस झाला होता. या पावसाने मोठे नुकसान केले होते. त्यात आता पुन्हा रेड अलर्ट देण्यात आल्याने पावसाच्या काळात नागरिकांना सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img