19.7 C
New York

Uddhav Thackeray : भाजपची कबर महाराष्ट्रात बांधा, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनिकांना पेटवले

Published:

आगामी विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीच्यचा मोर्चेबांधणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आज पुण्यात शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीत भाजपची कबर महाराष्ट्रात बांधा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं.

पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्याला संबोधित करतांना ठाकरे म्हणाले, शिवसेना म्हणजे भाकड जनता पक्ष नाही. तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे. त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर सोपवली. आता लोकसभेत जेवढे वळ भापजच्या आणि गद्दारांच्या पाठीवर उठलेत, त्यापेक्षा अधिक वळ विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल. ज्या प्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याचप्रमाणे भाजपची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अजितदादा अन् शिंदेचं भाजप काय करणार? रोहित पवार म्हणाले

Uddhav Thackeray अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दाली

यावेळी बोलतांना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मी अमित शाहांना यापुढं अहमद शाह अब्दालीच म्हणणार. मला तुम्ही नकली संतान म्हणालात तेव्हा लाज नाही वाटली. मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत, मग तुम्ही अहमद शाह अब्दाली आहात, हे बोलायला मी का घाबरू? हा अहमद शाह पाहिजे की, भगवा हातात घेतलेला शिवसैनिक पाहिजे? हे आता जनतेने ठरवावे, असंही ठाकरेंनी म्हणाले.

Uddhav Thackeray फडणवीसांवरही डागलं टीकास्त्र

दोन दिवसांपूर्वी मी बोललो काहींना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मात्र, मी कोणालाही आव्हान देत नाही. नादाला लागण्याइतके तुमची कुवत नाही. मी कोणत्याही व्यक्तीला नाही, पक्षाला बोलतोय, असं म्हणत ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

अयोध्येतील राम मंदीर गळतंय. संसद भवन गळतंय. कारण संसद भवन बांधणारा काँट्रॅक्टर गुजरातचाच असल्याची माझी माहिती आहे. एक वर्ष झालं बांधकामाला. मोदी अजूनही काँग्रेसला हिशोब मागतात. संसद भवनाचा हिशोब आधी द्या. तुमचं सगळंच गळतंय मग याला गळती सरकार म्हणायचं. आमचं पाप यांना (भाजप) आम्ही हिंदुत्वाच्या वेडापायी पाठिंबा दिला होता असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img