3.1 C
New York

Traffic : मिरारोड आणि ठाण्याच्यामध्ये लोणावळ्याचा फिल, अभिनेता भडकला

Published:

अनेकदा काही कलाकार समाजातुन वेगवेगळ्या गोष्टींवर आपले मत सोशल माध्यमांवर परखडपाने मांडताना दिसतात. काहीजण ट्रोलिंगला घाबरून या पासून लांब राहणेच पसंत करतात. मराठी अभिनेता शशांक केतकर (shashank ketkar) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतोच मात्र सामाजिक भान जपत केलेले मते देखील नेहमीच त्याच्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. यापूर्वी, शशांकने रस्त्याच्या कडेला कचरा प्रदूषणाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. आता ट्रॅफिक जाम झाल्याने शशांक संतापला आहे.
शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. शूटिंगसाठी जाताना त्याला मुंबईच्या ट्रॅफिकचा (Traffic) सामना करावा लागल्याने त्याने प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. तासभर गाडी एका ठिकाणी थांबवल्यानंतर शशांकने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने ट्रॅफिक जामची सद्यस्थिती सांगितली आहे. या पोस्टद्वारे शशांक म्हणाला,

काय म्हणाला शशांक पाहा व्हिडिओ :

शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रकरणासंदर्भात काही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शशंकर यांनी मुंबई पोलिस, ठाणे पोलिसांसह मुंबई महापालिकेला टॅग केले आहे. दरम्यान, या अभिनेत्याच्या पोस्टवर नेटिझन्ससह अनेक मराठी कलाकारांनीही मुंबईतील वाहतूक कोंडीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img