निर्भयसिंह राणे
भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शुक्रवारी, 2 ऑगस्ट रोजी 2023 च्या विश्वचषकाचा फॉर्म कायम ठेवून परत मैदानात उतरले. कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने 47 चेंडूत 58 धावा फाटकावल्या. रोहितने सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. अंतिम षटकाराने त्याचे नाव सुवर्ण अक्षरात नाव कोरले. रोहितने आता एक कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत तेही केवळ 134 आंतराष्ट्रीय इंनिंग्समध्ये.
याच संदर्भात हे आहेत पाच सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार :
5 . ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – 170
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम 140 इंनिंग्समध्ये 170 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहेत. 2008 मध्ये त्यांनी कर्णधारपद स्वीकारले आणि 2015 च्या विश्वचषकाच्या हार्टब्रेकनंतरही काही काळ ते कर्णधार होते. मॅक्युलम बहुतेक सामने सलामीवीर म्हणून खेळेले आणि जगातील सर्वोत्तम आक्रमक सलामीवीरांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे.
4. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 171
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग 171 षटकारांसह या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. मॅक्युलमपेक्षा फक्त एक षटकार जास्त असून त्यांनी हा विक्रम तब्बल 236 इंनिंग्समध्ये हा पूर्ण केला आहे. 2002 मध्ये कर्णधारपद स्वीकारलेला पॉन्टिंग कधीच मोठा सिक्स हिटर नव्हता. त्याऐवजी, तो चौकार शोधण्यासाठी ओळखला जात होता. पॉंटिंगने आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून तब्बल 1,576 चौकार मारले होते, तेही मॅक्युलमच्या तिप्पट.
Rohit Sharma: भारतीय कर्णधाराची सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग असलेल्या एलिट लिस्टमध्ये समावेश
3. एम.एस धोनी (भारत) – 211
रोहितने जरी आपले नाव कर्णधार म्हणून कमावले असले तरीही, भारतात अजूनही जेव्हा तुम्ही एक वाक्यात “कर्णधार” आणि “षटकार” एकत्र ऐकता तेव्हा प्रत्येकाच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे एम.एस धोनी. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये वानखेडे स्टेडियमवर लॉन्ग-ऑनवरच्या षटकारासाठी तो ओळखला जातो. परंतु धोनीने 2007-2018 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 330 इंनिंग्समध्ये कर्णधार म्हणून 210 षटकार मारले.
2. ओइन मॉर्गन (इंग्लंड) – 233
2015 च्या विश्वचषकात झालेला खडतर प्रवासानंतर, मॉर्गनने संपूर्ण संघाची पुनर्बांधणी केली, उच्च प्रतीच्या क्रिकेटिंग माईंडने आणि आधुनिक डेटा वापरून त्याने संघ निवडून 2019 चा विश्वचषक आपल्या नवे केला. मॉर्गनने 2011 ते 2022 या 11 वर्षात 180 इंनिंग्स मध्ये 233 षटकार मारले. अफगाणिस्तानविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात त्याने तब्बल 17 षटकार मारून सर्व क्रिकेटप्रेमींना एक अनोखं प्रदर्शन केलं.
1. रोहित शर्मा (भारत) – 234
रोहित शर्माने मॉर्गनचा विक्रम केवळ 134 इंनिंग्स मध्ये मोडत या पिढीच्या आक्रमक फलंदाजीला दुजोरा देते. सध्याच्या युगातला रोहित शर्मा हा एक अनोखा सिक्स हिटर असून त्याची षटकार मारण्याची क्षमता जवळजवळ अतुलनीय आहे. या यादीतील इतर प्रत्येकजण प्रतिष्ठित लीडर आहे, जरी रोहितने भारताला एकदिवसीय विश्वचषक मिळवून देऊ शकला नाही तरीही त्याने आपल्या क्रिकेटिंग माईंडने सर्व क्रिकेटपप्रेमींचे मन जिंकले आहे. भारतात एका नवीन इन्टेन्टने फलंदाजी करण्याची स्ट्रॅटेजी रोहितने 2023 च्या विश्वचषकात दाखवून दिली आहे.