निर्भयसिंह राणे
टीम इंडिया शुक्रवारी, 2 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL ODI) पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे. भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड(Anshuman Gaekwad) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी हातावर काळी पट्टी बांधली आहे. गायकवाड हे काही काळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते, पण दुर्दैवाने बुधवारी, 31 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. BCCI चे सचिव जय शाह यांनी त्यांच्या उपचारासाठी ₹ 1 कोटी देण्याचे वचन दिले होते. अंशुमन गायकवाडने आपल्या कारकिर्दीत 40 एकदिवसीय आणि 15 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मागील शतकाच्या शेवटच्या वर्षांत त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.
टीम इंडियाचे कर्णधार रोहित शर्मानेही कोलंबोमध्ये सामनापूर्व पत्रकार परिषदेत शोक व्यक्त केला. “अंशुमन गायकवाड यांच्या निधनाची बातमी ऐकून मी खूप उध्वस्त झालो. पूर्वी त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली होती,“ असं रोहित म्हणाला.
R Ashwin : काय… अश्विनने दिली स्वतःच्याच टीम मेंबरला धमकी?
टीम इंडियाने पहिल्या वनडेत प्रथम गोलंदाजी करायचा ठरवलं :
चँपियन्स ट्रॉफीचा रास्ता भारतीय संघाने श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेपासून सुरु केलाय. हा सामना रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नवीन डायनॅमिक जोडीचा पहिला सामान सुद्धा आहे . 50 ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यासारख्यांनाही परत स्क्वाडमध्ये भरती केल आहे. टीम इंडियाने 1997 पासून श्रीलंकेविरुद्ध फक्त एकच बायलॅटरल मालिका गमावली आहे आणि त्यात वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न भारत जरूर करेल.