8.4 C
New York

IND vs SL ODI : भारत विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर आणि ऑनलाईन कधी आणि कुठे पाहायचा

Published:

निर्भयसिंह राणे

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) 2024 T20 विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय ड्युटीवर परतले आहेत कारण शुक्रवारी कोलंबोमध्ये भारताचा श्रीलंकाविरुद्ध एकदिवसीय (IND vs SL ODI) सामना आहे. रोहित आणि कोहली दोघांनीही T20I मधून निवृत्ती घेतली आहे आणि त्यामुळे ते या दौऱ्यातील पहिल्या तीन सामन्यांना अनुपस्थित होते. भारताने तिन्ही सामने जिंकले, पहिल्या दोन सामन्यात श्रीलंकेला सहज पराभूत केले आणि नंतर सुपर अव्हर मध्ये तिसरा सामना जिंकला.

रोहित आणि कोहलीची जोडी पहिल्यांदाच नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) सोबत काम करणार आहे. गौतम गंभीर रोहितसोबत कसे काम करतो हे पाहणे विशेषतः मनोरंज असेल कारण विराट आणि रोहितची जोडी फिट असल्यास 2027 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळण्यासाठी गंभीरने रोहित आणि कोहली दोघांना पाठिंबा दिला आहे. गंभीरने रोहित आणि कोहलीसोबत आपल्या कारकिर्दीतली बरीच वर्षे एकत्र ड्रेसिंग रूममध्ये घालवली आहेत.

आर. प्रेमदासा स्टेडियमवर अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या कोहलीपासून श्रीलंका विशेषतः सावध असेल. 11 सामने आणि 10 इंनिंग्समध्ये त्याने 107.33 च्या सरासरीने चार शतके आणि एक अर्धशतकांसह 644 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या तिथे 131 आहे. कोलंबो येथे त्याच्या गेल्या पाच डावांमध्ये त्याने 4 शतके झळकावली आहेत. कोलंबोमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये विराटने 16 डावांमध्ये 82.81 च्या सरासरीने 911 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर 14,000 वनडे धावा पूर्ण करणारा तिसरा क्रिकेटर होण्यापासून कोहली फक्त 152 धावा दूर आहे.

Virat Kohli : श्रीलंकेत विराट कोहलीच्या वनडेतील टॉप 5 खेळी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे कुठे होणार आहे ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना कोलंबो, आर.प्रेमदासा (R.Premadasa Stadium) स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेचे थेट प्रक्षेपण तुम्ही कसे पाहू शकतात ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडेचं थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स टेन 1, सोनी स्पोर्ट्स टेन 1 HD, सोनी स्पोर्ट्स टेन 5 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 HD टीव्ही चॅनलवर थेट प्रक्षेपण होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम तुम्ही कुठे पाहू शकता ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगचे थेट प्रवाह SonyLiv वर उपलब्ध असेल, किंवा OTTplay वर सुद्धा थेट प्रक्षेपण पाहू शकता.

भारत आणि श्रीलंका यांच्या एकदिवसीय मालिकेचे दोन्ही संघ :
भारत: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (W), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, हर्षित राणा

श्रीलंका: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (W), सदीरा समराविक्रमा, चरिथ असालंका (C), जेनिथ लियानागे, डुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणारन्ना, अकांका, डेनिस, मेनिस , निशान मधुष्का, एशान मलिंगा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img