19.7 C
New York

R Ashwin : काय… अश्विनने दिली स्वतःच्याच टीम मेंबरला धमकी?

Published:

निर्भयसिंह राणे

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफ-स्पिनर आर अश्विन (R Ashwin) हा त्याच्या खेळाच्या शिस्तीसाठी जाणला जातो व खेळातील सर्व नियम न तोडून खेळाचा भंग करत नाही, परंतु सध्या अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) खेळात आहे. 1 जुलै रोजी झालेल्या सामन्यात त्याला आपल्याच टीममधल्या खेळाडूवर राग आला होता. अश्विनचा राग कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबर व्हायरल झाला.

आर अश्विन हा तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दिंडीगुल ड्रॅगन्सचा (Dindigul Dragons) कर्णधार आहे. या मोसमात तो गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही आपली चमक दाखवत आहे. तो ओपनिंगही करताना दिसत आहे. चेपॉक सुपर गिलीज (Chepauk Super Gillies) विरुद्धच्या सामन्यात अश्विनने दमदार कामगिरी दर्शवत संघाला विजयापर्यंत नेले, परंतु तो त्याच्या एका सहकार्यावरच्या रागामुळे सध्या चर्चेत आहे.

IND vs SL ODI : भारत विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर आणि ऑनलाईन कधी आणि कुठे पाहायचा

अश्विन 57 धावांची त्याची इनिंग खेळून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याची विकेट पडल्याच्या पुढच्या चेंडूवर आणखी की विकेट पडली. शिवम सिंग आणि नवा फलंदाज बाबा इंद्रजित यांच्या गोंधळ उडाला आणि इंद्रजी पहिल्याच चेंडूवर रन-आऊट झाले. सलग दुसरी विकेट पडल्यामुळे अश्विनला आपला राग आवरता आला नाही आणि तो त्याच्या जागेवर उभा राहून दोन्ही खेळाडूंवर ओरडायला लागला. अश्विनचा हा अवतार पाहून दिंडीगुल संघातील सर्व खेळाडूंना अशचर्याचा धक्का बसला

या सामन्यात अश्विनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा संघ दिंडीगुल ड्रॅगन्सने चेपॉक सुपर गिलीजला 158 धावांवर रोखले. शिवम सिंगच्या 49 चेंडूत 64 धावा आणि अश्विनच्या 35 चेंडूत 57 धावांच्या जोरावर दिंडीगुल ड्रॅगन्स संघाने 19.1 षटकांत 4 गडी राखून 161 धावा केल्या आणि अंतिम फेरीत धडक दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img