10.3 C
New York

Mumbai Lakes : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचे 10 वर्ष झालं निर्जंतुकीकरण नाही ?

Published:

गेल्या दहा वर्षांपासून मुख्य पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव आणि जलाशयांवर कोणतेही निर्जंतुकीकरण केले नसल्याचं माहिती अधिकारातून उघड झाली आहे . तसेच स्वत: महानगरपालिकेने याबाबत माहिती देत कबूलही केले आहे. गेल्या दहा वर्षात अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मधली वैतरणा, भातसा, वेहार आणि तुळशी या तलावांमध्ये/जलाशयांमध्ये केलेल्या डिस्लिटिंगच्या कामाचा तपशील आणि या कामांवर खर्च झालेला पैसा याबाबत नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे पर्यावरण रक्षक बी. एन. कुमार यांनी माहिती मागितली होती. यामुळे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Lakes महानगरपालिकेने काय उत्तर दिले?

सदर प्रकारावर महानगरपालिकेने माहिती देताना म्हटले आहे, या कार्यालयीन नोंदीनुसार, उपनगरांतर्गत मोडकसागर, तानसा आणि मध्य वैतरणा या तलावांमध्ये/जलाशयांमध्ये गाळ काढण्याचे कोणतेही काम झालेले नाही. कापूरबावडीतही गेल्या दहा वर्षांत गाळ काढण्याचे काम झालेलं नाही.

विरारमध्ये भरधाव फॉर्च्युनरनं प्राध्यापिकेला चिरडलं

Mumbai Lakes नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे पर्यावरण रक्षक बी. एन. कुमार काय म्हणाले?

सात तलाव आणि जलाशय मिळून शहराला दररोज एकूण 3.4 अब्ज लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात. पावसाळ्यात धरणे आणि तलाव ओसंडून वाहतात आणि तरीही उन्हाळ्यात शहराला पाणीकपातीला सामोरे जावे लागते. हा अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन नॅटकनेक्टने आरटीआय अर्ज दाखल केला आहे. तलाव आणि जलाशयांच्या तळाशी गाळ साठल्याने साहजिकच दिशाभूल करणारी आकडेवारी समोर येते असं कुमार यांचे म्हणणं आहे. यामुळे शहर आणि उपनगरात कोट्यवधी रुपयांचे पाणी टँकर माफियाचे रॅकेट राज्य करत असल्याचे कुमार म्हणतात.

Mumbai Lakes पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली-

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यात जमा आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव (Mumbai Lakes) मुंबईत गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे (Mumbai Rain) ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे 10 टक्के पाणीकपात मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेली रद्द करण्यात आली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. पाणीसाठ्यात परिणामी सातत्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी यंदाच्या उन्हाळ्यात तळ गाठला होता. मुंबईकरांची पाण्याची चिंता जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे कायम होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने ही सगळी कसर भरुन काढली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img