10.3 C
New York

SRA : सरकारच्या विरोधात रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा

Published:

रमेश औताडे, मुंबई

झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) बाबत सरकार गंभीर नाही. अनेक वर्षापासून कुर्ला (पश्चिम) येथील संदेश नगर व क्रांती नगर येथील रहिवाशी सरकारच्या मनमानी कारभाराला कंटाळले आहेत. त्यामुळे सरकारने आता जर याप्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ५ ऑगस्टला आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मुंबई झोपडपट्टी चळवळ व एकता समाज कल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष घनश्याम भापकर (Ghanshyam Bhapkar) यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

एच.डी.आय.एल. प्रिमियर, विद्याविहार येथील बांधलेल्या इमारती कुर्ला (पश्चिम) येथील संदेश नगर व क्रांती नगरच्या रहिवाशांच्या हक्काच्या आहेत.पंरतु सद्या एम एम आर डी ए ने ३० पैकी फक्त ३ इमारती या रहिवाशांना दिल्या आहेत. संदेश नगर, क्रांती नगरच्या सर्व झोपड्यांची संख्या ३७४७ असताना फक्त ३ इमारती कशा दिल्या गेल्या ? असा सवाल घनश्याम भापकर यांनी यावेळी केला.

एच.डी.आय.एल. विद्याविहार प्रकल्प हा या ठिकाणी राहणाऱ्या जनतेच्या नावांवर उभारला आहे. त्यामुळे कोणाच्याही मनमानीनुसार इमारतीचे वितरण होऊ देणार नाही. असे सांगत भापकर म्हणाले, २९ व ३० या क्रमांकाच्या इमारतीत संदेश नगर व क्रांती नगरचे पुर्नवसन झालेच पहिजे. तसेच करोडो रुपयांची जमीन केंद्र शासनाला हवी असेल तर मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण (अदानी कंपनी ) ला आमच्या पात्र व अपात्र झोपड्यांचे पुर्नवसनासाठी लागणारा सर्व खर्च दयावे लागेल अशी मागणी भापकर यांनी केली.

पात्र आणि अपात्र झोपडयांचे पुर्नवसन करा, २९, ३० इमारतीत त्वरीत पुर्नवसन करा, हस्तांतरण शुल्क – ४०,००० सहशुल्क २,५०,००० अदाणी कंपनी कडुन घेणे, बाधित झोपडीधारकच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मुंबई अंतरराष्ट्रीय किंवा नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणात शैक्षणिक पात्रतेवर नोकरी दया. या मागण्या करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img