21 C
New York

Prakash Ambedkar : महाराष्ट्रातील ‘या’ 4 नेत्यांच्या गाड्या फोडा; आंबेडकरांचं वादग्रस्त विधान

Published:

परभणी

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत पक्षीय फोडाफोडीचं राजकारण बघायला मिळालं होतं. पण आता रस्त्यांवर फोडाफोडी बघायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) आधी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे गाड्या फोडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल शैलीत भाष्य केलं आहे. चिल्लरांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार (Sharad Pawar) , उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाड्या फोडा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलंय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा आज परभणीमध्ये दाखल झाली. यावेळी जाहीर सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर थेट भाष्य केलंय. , , Devendra Fadnavis

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात सध्या गाड्या फोडल्या जात आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना जरा आवर घाला, चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता, तुम्हाला जर गाड्याच फोडायच्या असतील तर मी नावं सांगतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा म्हणजे हे लोकं पोपटासारखे बोलू लागतील की आम्ही कोणाच्या बाजूने आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु आहे. लोकांना आरक्षण संविधानाच्या कलमांमधून सरकार देणार आहे. दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चुकीचं हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, पण जनतेच्या हातात फक्त मतदान देण्याचं आहे. त्यामुळे भडकाऊ राजकारण्यांपासून सावध रहा, त्यांच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण वातावरण बिघडू देऊ नका हाच या यात्रेचा उद्देश असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलयं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आलायं. मराठा समाजाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करावं, अन् ओबीसी समाजाने ओबीसी उमेदवारालाच मतदान करावं दोघांनीही एकमेकांना मतदान करण्याच्या भानगडीत पडू नये, कोणीतही निवडून येईलच. जो निवडून आला तो राज्य करणार आहे, त्यानंतर तो ठरवणार आहे की आरक्षण द्यायचं की नाही. राज्य कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार मतदारराजाचा असतो, असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img