8.9 C
New York

Manorama Khedkar : मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर

Published:

पुणे

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना जामीन मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. पण आता त्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे सत्र न्यायालायनं (Pune Sessions court) त्यांना जमीन मंजूर केला आहे.

शेतीच्या वादातून हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर करण्यात आलायं. पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर ज्या शेतकऱ्याला मनोरमा यांनी धमकावलं होतं, त्या शेतकऱ्याने पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खेडकर यांना रायगडमधून पोलिसांनी अटक केली. तपासाअंती मनोरमा खेडकर यांना आज जामीन मंजूर करण्यात आलायं.

पुण्यातील मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांनी जमीन खरेदी केली. या जमीनीलगतच एका शेतकऱ्याची जमीन आहे. अतिक्रमण होत असल्याचा वाद खेडकर आणि संबंधित शेतकऱ्यामध्ये होता. त्यावरुन संबंधित शेतकरी आणि मनोरमा खेडकर यांच्या वाद झाला. हा वाद न्यायप्रविष्ट असतानाच मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ समोर येताच शेतकऱ्यांने पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली.

मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांनी पुण्यातून पळ काढला होता. रायगडमधील एका हॉटेलमध्ये आसरा घेतला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. खेडकर यांच्या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर खेडकर यांच्यावर कलम 307 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img