मुंबई
यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दणका दिला आहे. पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता होती.
आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला घेण्यात येणार आहे. हा निर्णय पतियाळा कोर्टाकडून देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच पूजा या दुबईला पसार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूजा खेडकर यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथ परदेशात रवाना होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
त्याचबरोबर पूजा खेडकरला मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये देखील गैरवर्तन केल्यामुळे तब्बल आठ वेळा मेमो देण्यात आल्याची माहिती आहे. 2022 मध्ये आयएएसमध्ये निवड होण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्राचाही लाभ पूजा खेडकरने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तब्बल 7 वेळा आपलं नाव बदलून परिक्षा दिल्याची माहिती आहे.