18.8 C
New York

Swapnil Kusale : पदकवीर ‘स्वप्निल’ला रेल्वेनेही दिलं प्रमोशन

Published:

महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसाळेने ऑलिम्पिक (Swapnil Kusale) स्पर्धेत शानदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. देशासह महाराष्ट्राचाही मान वाढविण्याचं (Paris Olympics) काम स्वप्निलने केलं. त्याच्या या यशाचा आनंद देशात साजरा होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी या यशाच्या आनंदात स्वप्निल कुसाळेला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. आता रेल्वेनेही स्वप्निलला गुडन्यूज दिली आहे. स्वप्निल भारतीय रेल्वेत तिकीट कलेक्टर पदावर कार्यरत आहे. या कामगिरीनंतर स्वप्निल भारतात परतताच त्याला थेट अधिकारीपदी नियुक्ती दिली जाणार आहे.

नेमबाज स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसळेचा हा विजय ऐतिहासिक आहे कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कोल्हापूरच्या या २९ वर्षीय नेमबाजाचे हे पहिलेच ऑलिम्पिक (Paris Olympics ) आहे. या खेळाडूने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी हा खेळाडू 12 वर्षांपासून प्रयत्न करत होता आणि पॅरिसमध्ये त्याला संधी मिळाल्यावर त्याने इतिहास रचला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सन्मान यात्रेचे शिवसेनेकडून आयोजन

Swapnil Kusale स्वप्निलला एक कोटींचं बक्षीस

स्वप्निलने कांस्यपदक पटकावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वप्निलसह कुटुंबियांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. खाशाबा जाधव यांच्यानंतर भारताला तब्बल 72 वर्षांनी वैयक्तिक खेळामध्ये कांस्यपदक मिळालं असून कोल्हापुरच्या छोट्याशा गावातील स्वप्निलने इतिहास रचला आहे. स्वप्निलसह त्याचे प्रशिक्षक विश्वजीत शिंदे आणि दिपाली देशपांडे, सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानत आहे. या यशाबद्दल आम्हाला स्वप्निलचा अभिमान आणि गौरव असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. स्वप्निल कुसळेला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

स्वप्निल कुसाळे सध्या मध्य रेल्वेत तिकीट कलेक्टर या पदावर कार्यरत आहे. मध्य रेल्वेची ही अभिमानाची गोष्ट आहे. स्वप्निल हा भारतात परत येईल त्यावेळी त्याचा सन्मान करण्यात येईल. त्याला ताबडतोब रेल्वेत अधिकारीपदी नियुक्ती देण्यात येईल अशी घोषणा मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दिली. रेल्वेमंत्री सुद्धा स्वप्निलला रोख बक्षीस जाहीर करणार आहेत. आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा अधिकारी म्हणून येथून पुढे काम करेल, असे यादव यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img