सिल्लोड
सिल्लोड येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जात असताना सकल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून मराठा आंदोलकांनी (Maratha protesters) निषेध व्यक्त केला व घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्रींचा ताफा जळगाव महामार्गावरून भवन गावाजवळ आला असता भवन गावातील मराठा समाजाच्या नागरिकांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवला आहे, यावेळी मराठा समाजाचे दत्तात्रय पांढरे, सोमीनाथ कळम, रमेश काकडे आदी सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे.