7.3 C
New York

Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात जनहित याचिका!

Published:

मुंबई

लाडकी बहीण योजनेला (Majhi Ladki Bahin Yojana) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान देण्यात आले आहे. नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंट यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात यासंबंधीची याचिका सादर केली आहे. या याचिकेत लाडकी बहीण योजना का? हा तर करदात्यांच्या पैश्यांचा अपव्यव आहे असा मुद्दा या उपस्थित करण्यात आला आहे. लाडकी बहीणी योजनेविरोधातील या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास, तसेच लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी याचिकेवर सुनावणीस एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने याचिकाकर्त्याची विनंती मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटटने लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. तसेच या योजनेला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. उलट याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का? असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला केला आहे.

यावेळ लाडकी बहीण योजना ही तर करदात्यांच्या पैश्याचा अपव्यय आहे. त्यामुळे तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे, असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला होता. येत्या 14 ऑगस्ट रोजी सरकारी तिजोरीतून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. त्यालाही स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने ही मागणीही फेटाळून लावली आहे. आता या याचिकेवर 6 ऑगस्ट मंगळवारी रोजी सुनावणी होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img