राज्यातील हिट अँड रनच्या (Hit And Run) मालिका संपण्याचं नाव घेईना. विरारमध्ये (Virar Accident) घडलेल्या अशाच एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. विरारमध्ये (Virar) एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आत्मजा कासट असं प्राध्यापिकेचं नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.
विरारमधील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका आत्मजा कासट यांचा गुरुवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरारमध्ये खळबळ माजली आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. आत्मजा कासट (वय ४६) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.आत्मजा कासट या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी (ता. १) संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होते. कारचालकाने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे.
शिमला-कुल्लूत आकाश फाटले ! पन्नासहून अधिक लोक बेपत्ता
उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका आत्मजा कासट यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. यावेळी पाठी मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना धडक दिली. आलिशान फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्यानंतर आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. या अपघातात आत्मजा कासट गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर आत्मजा कासट यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.