26.6 C
New York

Eknath Shinde : उंबार्ली येथील जागा सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) जवळील उंबार्ली परिसरात मालकी हक्कावर विकासकांकडून जागेचा सर्व्हेला आम्ही कडाडून विरोध केला आहे. आमच्या न्यायहक्कासाठी शेतकरी (Farmer) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असल्याचे लालचंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गुरुवार 1 ऑगस्ट रोजी सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध करताना पाटील पत्रकारांना म्हणाले.

गुरुवारी उंबार्ली गावात विकासकाचे कर्मचारी सर्व्हेक्षणासाठी आले असता शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. उंबार्ली गावात साडे सहा एकरची जागा आहे. या जागेच्या सर्वेक्षणाकरीता सर्व्हेक्षण सुरु होते.या जागेवर मालकी हक्का संबंधीत वाद आहे.या ठिकाणी पोलीस पोहोचले होते. यावेळी सर्वेक्षणाला शेतकऱ्यांसोबत महिला वर्गानेही विरोध केला. तणावाची परिस्थिती पाहता त्याठिकाणी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे आले.यावेळी शहर प्रमुख मोरे यांनी येत्या दोन दिवसात विकासक आणि शेतकरी यांना एकत्रित बसवून या प्रकरणी तोडगा काढला काढू. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकरी मागे फिरले.तर लालचंद पाटील म्हणाले, या सर्व्हेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आमच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मांडणार आहोत. ‘जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची’ अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img