10.3 C
New York

Diva Lift Accident : दिव्यात लिफ्टच्या ओपन स्पेसजमध्ये पडून 3 वर्षीय मुलीचा मृत्यू

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

दिव्यात (Diva) मुंब्रा देवी कॉलनी सेंट मेरी स्कूल च्या पाठीमागे सात मजली इमारतीच्या लिफ्टसाठी मोकळी जागेत साचलेल्या पाण्यात बुडून त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी दीक्षा रामनाथ सहानी (Deeksha Sahani) या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू (Diva Lift Accident) झाला. ही घटना गुरुवार 1 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

मुलीच्या मृत्यला विकासक जबाबदार असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे. याबाबत मुंडे म्हणाले, दिवा शहरात अनेक ठिकाणी विकासक लोकांकडून रूम विकल्यानंतर लिफ्ट साठी पैसे घेतात. परंतु ती लिफ्ट वर्षोनुवर्षे बांधली जात नाही. त्यामुळे हे लिफ्टचे ओपन पॅसेज असेच उघडे असून अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत.गुरुवारी ओपन पेस मध्ये कोणतेही सुरक्षेचा नियोजन विकासकाने केले नसल्याने त्या डग मध्ये पाणी साचले होते व त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी दीक्षा रामनाथ सहानी तीन वर्षीय मुलीचा त्यात पडून दुर्दैव मृत्यू झाला. अशा बेजबाबदार विकासकावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर या विकासकावर गुन्हा दाखल झाला नाही तर दिवा शहरात मोठे आंदोलन करू असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.मृत्यू पावलेल्या मुलीच्या परिवाराला तात्काळ विकासकाने दहा लाखाची मदत करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img