21 C
New York

Vishalgad : विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करा; ‘या’ संघटनेचे मागणी

Published:

रमेश औताडे, मुंबई

विशाळगड (Vishalgad) अनधिकृत बांधकाम प्रकरण सध्या गाजत असताना “असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ कैंसिल रिचटिगेट द ट्रोल” व “सेंटर फॉर स्टडी ऑफ सेक्युलरिजम” या संघटनांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मुस्लिम समाजाच्या अनेक पिढ्या या ठिकाणी राहतात. त्यांनी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केलेला नाही, त्यांच्याकडे जमिनी आणि घरांचे पुरावे , मशिदीची कागदपत्रे व इतर पुरावे असताना हा हल्ला चुकीचा आहे. या भागातील मुस्लिम पुरुष मोठ्या संख्येने परदेशात व मुंबईत काम करतात. सुट्टी व सण असला की गावी येतात . विशाळगडमधील अनधिकृत दुकानाशी त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावर हल्ला का ? असा सवाल मोहम्मद गाझी यांनी यावेळी केला.

पोलिस एफआयआरमध्ये नाव असलेल्या नारायण वेल्हार या व्यक्तीच्या घरी एका मोठ्या व्यक्तीच्या पुढाकाराने काही बैठका यापूर्वी झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.एफआयआर मध्ये नारायण पांडुरंग वेल्हार यांचे नाव असताना पोलीस ते घेत नाहीत. ती पोलिसांनी दक्षता घ्यायला हवी होती ती घेतलेली नाही अशी माहिती शाकीर शेख यांनी दिली.

या हल्ल्यात मालमत्तेची आर्थिक नुकसान झाले आहे. सर्व जनता जिवाच्या भीतीने घाबरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गजापूर हल्ल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शाकीर शेख यांनी यावेळी केली.

मिथिला राऊत, प्रीतम घनघावे, मेराज सिद्दीकी, अशफाक पठाण, ऍड अकबर मकानदार, इस्माईल शेख, रवी पाटील, मजह फारुक, अधिवक्ता अभय टाकसाळ, अब्दुल मुजीब, मोहम्मद अस्लम गाझी, यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img