21 C
New York

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

Published:

भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे आता आपल्याला दिल्लीच्या राजकारणात पाहायला मिळू शकतात. फडणवीस यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल अशा चर्चा सुरु आहेत. पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय (BJP National President) अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे. फडणवीस दिल्लीला गेल्यावर विनोद तावडे यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा देण्यात येईल असेही बोललं जातंय.

Devendra Fadnavis पीए मोदींची फडणवीसांसोबत बंददाराआड चर्चा

नुकत्याच झालेल्या नीती आयोगाच्या अधिकृत बैठकीनंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासीत राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दरवाजाआड चर्चा केली.

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे. संघटन कौशल्य, निवडणुकीची रणनीती आखण्याचा भाग असो किंवा कोणत्याही राजकीय संकटातून पक्षाला सहीसलामत बाहेर काढण्याचा विषय असो, या सगळ्याबाबत सध्याच्या घडीला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करणारे मोजके नेते आहेत. फडणवीसांचा हाच आवाका आणि क्षमतांचा वापर राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेसाठी करुन घेता येईल, अशी भाजप नेतृत्त्वाची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.

देवेंद्र फडणवीसांवरील टिकेवरून विखेंचा हल्लाबोल

Devendra Fadnavis विधानसभा निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच?

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचा भाजप पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ काही आठवड्यांपूर्वीच संपला आहे. त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेतृत्व कोणाकडे असेल?, हा आता पक्षांतर्गत चर्चेचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहतील आणि त्यानंतर नवी दिल्लीत जाऊन पक्षाची मोठी जबाबदारी स्वीकारतील, असा एक मतप्रवाह पक्षांतर्गत आहे.

Devendra Fadnavis महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्त्व कोणाकडे? तावडेंचे नाव चर्चेत

दरम्यान, नवी दिल्लीतील ताज्या घडामोडीवरुन असे संकेत मिळत आहेत की फडणवीस हे अपेक्षेपेक्षा लवकर नवी दिल्लीत जाऊ शकतात. महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्त्व कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर भाजपचे पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव पुढे येत आहे. दरम्यान, भाजपमधील सूत्रांनी महाराष्ट्रात नेतृत्त्व कोणाकडे? याची पुष्टी केलेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img