निर्भयसिंह राणे
श्रीलंका क्रिकेटने (SLC) 2 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या (IND vs SL) तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी माथीशा पाथीरानाच्या (Matheesha Pathirana) दुखापतीमुळे एकदिवसीय संघात मोहम्मद शिराजला (Mohammad Shiraz) बोलावले आहे. तिन्ही एकदिवसीय सामने कोलंबो (Colombo) येथील आर. प्रेमदासा (R. Premadasa) स्टेडियमवर खेळल्या जातील. अलीकडच्या काळातील श्रीलंकेच्या सर्वात आक्रमक गोलंदाजांपैकी एक असलेल्या पाथीरानाला मंगळवारी पल्लेकेले येथे तिसऱ्या आणि अंतिम T20I दरम्यान खांद्याला दुखापत झाली. डीप बॅकवर्ड पॉईंटवर माथीशाच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नांमुळे दुखापत होऊन त्याला खांदा धरून मैदानाबाहेर जावे लागले.
इंनिगन्सच्या सातव्या अव्हरमध्ये घडलेल्या घटनेमुळे, पाथीरानाने त्या दुखापतीनंतर एकही अव्हेर टाकली नाही आणि तो तिन्ही सामने खेळू शकणार नाही आहे. शिराझने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसून सुद्धा त्याचे ए-लिस्ट क्रिकेटमध्ये त्याची फार चांगली कामगिरी दिसून आली आहे. 29 वर्षीय शिराझने 47 सामन्यांमध्ये 17.52 च्या सरासरीने 80 विकेट्स घेतल्या आहेत.
Ravichandran Ashwin : दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अश्विन स्वतःच पडले, नेमकं प्रकरण काय
दरम्यान, श्रीलंकेला T20I मालिकेत 3-0 ने लाजिरवाण्या पराभवाला सामोरी जावे लागले. यजमान तिन्ही सामन्यांमध्ये मजबूर स्तिथीत असतानाही सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) उत्तम नेतृत्वाखाली भरताने तिन्ही सामने जिंकले. सर्वात निराशाजनक कामगिरी तिसऱ्या T20I मध्ये झाली जेव्हा श्रीलंका एका टप्प्यावर 110-1 वर चंगल्या स्तिथीत होती आणि शेवटच्या सहा ओव्हर्समध्ये भारताने टार्गेट डिफेन्ड करत सुपर अव्हेर पर्यंत सामन्याला नेऊन ठेवले. सूर्यकुमार यादवने सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत एक रोमहर्षक विजय भारताला मिळवून दिला.