3.6 C
New York

Lpg Gas Cylinder : महिन्याच्या पाहिल्याचं दिवशी; LPG सिलिंडर महागलं

Published:

ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला आहे. (Lpg Gas Cylinder)  लोकसभा निवडणुकीनंतर आणि मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या बजेटनंतर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सर्वात अखेरीस गॅस सिलेंडरच्या किंमतीत 9 मार्च 2024 रोजी कपात दिसली. सरकारने होळीच्या वेळी नागरिकांना दिलासा दिला. 100 रुपयांची कपात केली होती. तर त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 200 रुपयांनी गॅस स्वस्त झाला होता. एका वर्षात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 300 रुपयांची कपात केली आहे. तर आता किंमतीत वाढ झाली आहे.

Lpg Gas Cylinder  काय आहेत नवे दर?

IOCLच्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाल्या आहेत. ताज्या बदलानुसार, दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे, ज्यामध्ये प्रति सिलिंडर 6.50 रुपयांची वाढ झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली आहे, ज्यामुळे ती किंमत 1756 रुपयांवरून 1764.50 रुपये झाली आहे. 7 रुपयांनी वाढून 1598 रुपयांवरून 1605 रुपये मुंबईमध्ये सिलिंडरची किंमत झाली आहे. चेन्नईमध्येही सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून, ती किंमत 1809.50 रुपयांवरून 1817 रुपये झाली आहे.

Lpg Gas Cylinder  आजपासून दरवाढ

आज 1 ऑगस्टपासून 802.50 रुपयांना मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर मिळणार आहे. तर 1605 रुपये 19 किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत झाली आहे. त्यात 7 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे दर 1598 रुपये होते. देशभरात ही वाढ आज पासून लागू करण्यात आली आहे.NDA सरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिला आहे.

Lpg Gas Cylinder  इतकी झाली वाढ

आज 1 ऑगस्टपासून संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर मुंबईत 7 रुपयांनी दरवाढ झाली आहे. ही दर वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img